एसटीचा ७७ वा वर्धापन दिन रोहा बसस्थानकात उत्साहात साजरा… बसस्थानकातील प्रवाशांचे गुलाब पुष्प व पेढ्यांनी स्वागत…

0
21

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा ७७ वा वर्धापन दिन रोहा बसस्थानकात मोठ्या उत्साहात व सोहळ्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…

कार्यक्रमास विभागीय भांडार अधिकारी श्री.विवेक नाळे,आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार, स्थानक प्रमुख व सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री.अजिंक्य बाळाराम रोहेकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. शंकर दुर्गाप्पा खानापूरकर,अनिल काशिनाथ म्हात्रे,वाहतूक नियंत्रक सुनील शेडगे, गणेश शेलार, नथुराम गावित, वरिष्ठ लिपिक संदीप गायकवाड, विकास खाडे यांच्यासह प्रशासनिक व यांत्रिकी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य बाळाराम रोहेकर यांनी केले. यावेळी प्रवाशांचे गुलाब पुष्प व पेढ्यांनी स्वागत करण्यात आले.बस स्थानकावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, तसेच ‘लाल परी’ बस विशेष फुलांनी सजवून साकारण्यात आली होती.एसटी सेवा ही ग्रामीण भागातील जनतेसाठी एक जीवनवाहिनी आहे.अशा या ऐतिहासिक व सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या सेवेचा वर्धापन दिन साजरा करताना उपस्थितांनी अभिमान व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांचे कर्मचारी,अधिकारी व स्थानक व्यवस्थापनाचे विशेष योगदान लाभले.