१७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याने रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

0
17

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-  

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली असुन अज्ञात व्यक्तींविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दुर्गामाता कॉलनी चांभालीऀ येथील सुमित संजय तायडे (वय१७) हा बालक पेंटर रवी संतोष कुमार यांच्यासोबत पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत पेंटिंग काम करण्यासाठी गेला होता.पेंटीग काम आटोपल्यानंतर कामावरून परत घरी येते वेळेस पेंटर रवी संतोष कुमार यांनी रसायनी येथील सिद्धेश्वरी कॉर्नर येथे सुमित यास रिक्षात बसवून दिले.परंतु सुमित हा वेळेवर घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचा कुठेही शोध न लागल्यामुळे सुमितचा चुलत भाऊ विजय कैलास तायडे यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.१७ वर्षीय सुमित चे वर्णन याप्रमाणे रंगाने सावळा,चेहरा गोल, उंची अंदाजे पाच फूट पाच इंच,अंगाने सडपातळ असून त्याने पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळून आल्यास त्यांनी रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनुसया ढोणे यांच्या ७७३८३८०३९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले आहे.सुमित तायडे याचे ९ जून रोजी अपहरण झाल्याने त्याच्या परिवारातील लोकांची चिंता वाढली आहे. सुमितचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून.याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. १३७(२) अन्वये नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे ह्या करीत आहेत.