अपंग संकेत रामचंद्र पाटील (बाळ्या)यांना रायगड जिल्हापरिषदेकडून दुचाकी… पंडितशेठ व चित्रा पाटील यांच्या पाठपुराव्याची घेतली दखल…  

0
33

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-  

अपंग कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, ज्यात आवश्यकतेनुसार मोटारसायकल गाड्या उपलब्ध करून दिल्या जातात…रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून अपंग असलेल्या संकेत रामचंद्र पाटील (बाळ्या) यांना मोटारसायकल देण्यात आली…अलिबागमध्ये राहणारे साईनाथ पवार हे पायाने अपंग आहेत…मात्र त्याही स्थितीत कामाला जाण्यासाठी त्यांना वाहनाची गरज होती..मात्र आर्थिक स्थिती नसल्याने कोणतेही वाहन घेणे शक्य नव्हते…रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने अपंगांसाठी योजना आणली…त्यावेळी रायगड जिल्हा परिषदमध्ये अपंग कल्याणासाठी जिल्हा परिषदेमध्ये ३ % उत्पन्न देत होते … त्यांनतर जिल्हापरिषदेचे पदाधिकारी आणि पंडितशेठ पाटील यांनी ती रक्कम ५% केली…ज्यामुळे अपंग कल्याणाला निधी उपलब्ध झाला… पंडितशेठ यांच्यासह इतर पदाधिकारी यांच्या कारकीर्दीत आलेला निधी लोकांपर्यंत थेट पोहचला पाहिजे अशी उपाययोजना करण्यात आली… रायगड जिल्हा परिषदेमध्ये पंडितशेठ असताना अपंग कल्याणासाठी आयकार्ड चे वाटप केले ,त्याच्यामुळे लोकांना सवलती मिळाल्या… आणि अपंग कल्याणमध्ये उत्कृष्ट काम केल्याने रायगड जिल्हापरिषदेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला…

संकेत रामचंद्र पाटील (बाळ्या) अपंग असूनही काम करण्याची जिद्द लक्षात घेऊन  पंडितशेठ पाटील व चित्रा पाटील यांनी पवार यांना गाडी मिळण्यासाठी जिल्हापरिषदेकडे प्रस्ताव पाठवला…तसेच वेळोवेळी पाठपुरावा केला… अपंग हे मुख्य प्रवाहात येण्यासाठी सायकलीचा वापर करतील… त्यांना प्रवासाला सुविधा होईल..या मुख्य उद्देशाने चित्रा पाटील यांनी देखील मदत केल्यामुळे पवार यांना मोटार सायकल उपलब्ध झाली असल्याचे पंडितशेठ पाटील यांनी सांगितले…तसेच पंडितशेठनी संकेत रामचंद्र पाटील (बाळ्या) यास गाडी ताब्यात देऊन रायगड जिल्हापरिषदेचे आभार मानले…त्यांच्या या निर्णयाचा अपंगांना फायदा होत असल्याचे बोलले जात आहे…