भेंडखळ ग्रामपंचायतिच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सन्मान… विविध उपक्रम राबविण्यात भेंडखळ ग्रामपंचायत सातत्याने अग्रेसर…

0
25

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यातील श्रीमंत असलेली भेंडखळ ग्रामपंचायतिच्या वतीने मंगळवार दिनांक १७ जुन  रोजी दुपारी ३ वाजता ३५० जेष्ठ नागरिकांचा ब्लँकेट आणि छत्री भेट देऊन सन्मानित करण्यात आले…

दरवर्षी भेंडखळ  ग्रामपंचायतिच्या वतीने  विधवा महिलांचा सन्मान, दिव्यांगाचा सन्मान, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, दहावी, बारावी, पदवीधरांचा सत्कार आणि उच्च शिक्षितांचा सन्मान, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबविण्यात भेंडखळ ग्रामपंचायत नेहमी अग्रेसर असते….

सदर प्रसंगी भेंडखळ ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका महिला मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते….