अलिबाग, पेण, मुरूड, सुधागड तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात… कालपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा दमदार हजेरी…

0
5

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे… अलिबाग तालुक्यासह पेण, मुरूड, सुधागड, कर्जत, खालापूर, रोहा तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय…. कालपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे… अलिबाग शहरात सुद्धा पावसाच्या मुसळधार सरी सुरू झाल्या आहेत… नद्या दुथडी भरून वाहत आहेत… त्यामुळे रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला असून, किनारपट्टीसह दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना रायगड जिल्हा व तालुका प्रशासनाकडून  सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत…