महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
लायन्स क्लब महाड, लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट पनवेल, प्राथमिक आरोग्य केंद्र वरंध व ग्रामपंचायत वरंध यांच्या संयुक्त सहकार्याने वरंध येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप त्याचबरोबर बीपी, शुगर इत्यादी आजारावर मोफतआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले…. बहुसंख्य ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, काही रुग्णांची पनवेल येथे मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे… या कार्यक्रमाकरिता श्रीमती बुटाला मॅडम अध्यक्ष लायन्स क्लब महाड व त्यांचे पदाधिकारी, गावचे सरपंच जयवंत देशमुख, उपसरपंच सौ.सुलभा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राजेश धनवडे, कीर्ती देशमुख हजर होते…. डॉ.नितीन देशमुख, शहाजी देशमुख, रमेश अण्णा देशमुख, आप्पा श्रीळीमकर, विकास धनावडे, बळीराम धनावडे, सई लाड, योगिता धनावडे, संध्या पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते… हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ.अश्विनी गणेश देशमुख, आशा राजेश धनवडे, मीनाक्षी धनावडे, संध्या जाधव, वनिता पिलाने या सीआरपी सदस्यांनी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आदींनी मेहनत घेतली….

