धामोते येथे मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबीर संपन्न…५०० हून अधिक नागरिकांनी डोळे तपासण्याचा घेतला लाभ…

0
6

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके ):-

धामोते येथील आगरी समाज सभागृहाच्या प्रांगणात दि. १६ जून २०२५ रोजी सामाजिक कार्यकर्त्या जोत्स्ना महेश विरले यांच्याकडून नेरळ तसेच धामोते गावातील रहिवासी यांच्यासाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्याचे शिबीर संपन्न झाले…

या शिबिरासाठी मुंबई येथून प्रसिद्ध नेत्र चीकीसक डॉ. विठ्ठल मोहिते व त्यांची टीम आली होती….
५०० हून अधिक नागरिकांनी आपले डोळे तपासून घेऊन ४९८ लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले… जोत्स्ना विरले सध्या विविध सामाजिक उपक्रम राबविताना दिसत आहेत… त्यातील गरजूंना चष्मे वाटप करून मोलाचे कार्य त्यांनी केले असल्याने अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…