रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध दर्शविला व मनसेची भूमिका स्पष्ट केली… याचवेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवले….
राजसाहेबांचे हेच पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हयातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा, कारमेल शाळा, पेण शिक्षण मंडळ, प्राथमिक शाळा अश्या शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आले व मुख्याध्यापकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या… यावेळी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदिप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील, विजय पाटील, नितेश पाटील, श्रीराम पाटील, प्रशांत म्हात्रे, पेण तालुका अध्यक्षा गौरी पाटील, पेण शहर संघटक नितीन पाटील, पेण शहर उपाध्यक्ष ऋषी कोळी, पंकज पाटील, हमरापूर विभाग अध्यक्ष तेजस पाटील, उपविभाग अध्यक्ष नमस्कार पाटील, जिते उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील, जिते विभाग अध्यक्ष भानुदास पाटील, जिते उपविभाग अध्यक्ष भरत पाटील आदींच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले…
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा करत असताना, मुख्याध्यापकांनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी सकारात्मक तयारी दर्शवली आणि राज ठाकरेंच्या भूमिकेचे विशेष कौतुक करीत मराठीसाठी मनसेच्या कामाचे आणि सदैव पाठपुराव्याकरीता सार्थ आभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले…