रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत) :-
रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे सिध्दार्थ नगर येथील गावाखाली असणाऱ्या एका शेत तलावात (सालडोली) पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवार दि.(20) रोजी घडली…. तरुण बुडाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना वाचविण्यासाठी तातडीने तरुण शेत तलावावर पोहचले… मोठ्या शर्तीने त्यांना बाहेर काढण्यात आले… बुडालेले तरुणांमध्ये एकाच कुटुंबातील जोहेब जाकीर अत्तार ( वय 17), मिझान जाकीर अत्तार ( वय14), अश्फाक अली (वय 16 ) यांचा समावेश आहे… या बुडालेल्या तरुणांना काही तरुणांनी बाहेर काढून तात्काळ रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेल्फेअर सेंटरमध्ये आणण्यात आले… येथील डॉक्टर व स्टाफने शर्तीचे प्रयत्न करून प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले… दरम्यान शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे आले…. बुडालेल्या तरुणांना नागरिकांनी खांद्यावर उचलून बाहेर आणले… घटनेची खबर मिळताच पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले… यावेळी स्थानिक तरुणांनी वेगाने मदतकार्य केले… यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती…