संघर्षाची वाट चालण्यास काँग्रेस कार्यकर्ते सज्ज व्हा – यू. बी. व्यंकटेश

0
30

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व कोकण प्रभारी यू. बी. व्यंकटेश यांनी गुरुवार, दिनांक १९ रोजी शेलघर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारला “गद्दार सरकार” म्हणत जोरदार टीका केली…. त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली आणि सोनिया गांधींचे त्याग, राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा तसेच ओबीसी हक्कांसाठी काँग्रेस पक्षाचा संघर्ष याचा उल्लेख केला…

व्यंकटेश यांनी भाजपच्या ४००+ जागा निवडून येतील या घोषणेचा समाचार घेतला आणि प्रत्यक्षात त्यांची संख्या २९० वरच थांबली हे अधोरेखित केले… विशेष म्हणजे, त्यातील सुमारे ९० उमेदवार हे काँग्रेस सोडून भाजपात गेलेले होते, असे त्यांनी निदर्शनास आणले… त्यांनी राज्यातील ‘लाडली बहीण’ योजनेसह इतर आश्वासनातील फसवणूक उघड केली आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून काँग्रेस नेत्यांवर दबाव टाकण्याच्या पद्धतीचा निषेध केला…

आगामी निवडणुकांसाठी योग्य निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले…. ओबीसी मेळाव्याची सुरुवात लवकरच जालन्यातून केली जाईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळातील लोकांशी जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले…. “रस्ता दूर आहे, मंजिल कठीण आहे, पण जायचेच आहे,” असे म्हणत व्यंकटेश यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकतेच्या आणि संघर्षाच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला…..