पनवेल शेडुंग येथील सेट विल्फ्रेड कॉलेजमध्ये ७९वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा… सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते सेट विल्फ्रेड कॉलेजमध्ये ध्वजारोहण…

0
5

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

पनवेल शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या सेट विल्फ्रेड सीबीएसई महाविद्यालयात ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्यात रसायनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यापीठ व महाविद्यालयातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सेट विल्फ्रेड महाविद्यालयाचे चेअरमन श्री. केशव बढाया, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे सीईओ श्री. मुकेश सोनी, सीओओ श्रीमती मंजुळा, सीबीएससी बोर्डाच्या प्राचार्य प्रिती सिंग, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या प्राचार्य श्रीमती स्वाती येवले, छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य डॉ. मनीष शर्मा, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. महरुफ बशीर, तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्राचार्य डॉ. जयंत बेहेरा उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत-नृत्यांनी वातावरण भारावून गेले. पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला अधिक उत्साही स्वरूप लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेट विल्फ्रेड कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.