महाड शिवसत्ता टाइम्स ( निलेश लोखंडे) :-
महाड तालुक्यात गेली बरेच दिवस पावसाची बॅटिंग सुरू असताना अत्यंत गर्मीचा उकाडा होत असून, किंजलघर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वीज पुरवठा नेहमीच खंडित करत असून, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे किंजल घर मुठावली शिरगाव येथील ग्रामस्थांना वीज पुरवठा नेहमीच खंडित होत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते… महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी वर्ग या गोष्टीकडे बारकाईने लक्ष न देता दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते… रात्री व दिवसा वीज पुरवठा एक एक तास खंडित केला जातो… आधीच गर्मी जास्त होत असल्याने या विभागातील जनतेला उकाड्याने हैराण केले असता वेळोवेळी वीज पुरवठा खंडित केला गेल्याने नागरिकांची काही कामे तसेच खोळंबून राहतात… वीज पुरवठा अचानक गायब केल्याने शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास तसाच राहतो… मग किंजळघर या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित का केला जातो, याचे कारण स्पष्ट झालेले नाही… येथील नागरिकांना अनेक प्रश्न पडलेले आहेत… किंजलघर येथील एक एक दोन दोन तास वीज पुरवठा खंडित का केला जातो, याची कारणे वीज कर्मचारी यांनी द्यावीत असेही प्रश्न नागरिकांना पडले आहेत… सतत वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने पूर्व सुरक्षित करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय सदस्य श्री. निलेश लोखंडे यांनी महाड येथील उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन सादर केले आहे… उपकार्यकारी अभियंता यांनी हा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे…