“औरंगजेब पवित्र?” माजी आ.आसिफ शेख यांच्या वादग्रस्त विधानाने मालेगाव पेटले!… भाजपचा तीव्र निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी!…

0
35

मालेगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

नाशिकच्या मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या बैठकीनंतर माजी आमदार आसिफ शेख यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे… “औरंगजेब हे पवित्र होते, ते टोपी शिवून आपला उदरनिर्वाह करत होते आणि ते सर्वधर्मसमभाव पाळणारे होते” – हे विधान करताच वातावरण ढवळून निघाले आहे….

या विधानामुळे संतप्त भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, “ही इतिहासाची थट्टा आहे! हे वक्तव्य हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारे आहे!” असा जोरदार आरोप करत आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली… तत्पूर्वी, भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिक्रियांनीच खळबळ उडवून दिली…

सदर वक्तव्याने भाजपचे पदाधिकारी नीलेश कचवे यांनी म्हटले की, “आसिफ शेख यांना त्वरित अटक झालीच पाहिजे. औरंगजेबला पवित्र म्हणणे म्हणजे राष्ट्रद्रोही आहे!” तर तालुका प्रमुख देवा पाटील म्हणाले की, “शेख यांचं वक्तव्य समाज तोडण्याचं षड्यंत्र आहे व त्यांच्यावर UAPA लावावा!” तसेच भाजप सेल सदस्य कमलेश निकम हे म्हणाले की, “हे केवळ राजकीय स्टंट नाही, तर समाजाला गंडवण्याचा डाव आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही!” तर मंडल अध्यक्षा रजिया आपा शाह “मुस्लीम समाजही याच्याविरोधात आहे व शेख यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवावं लागेल!” …. इतकंच नव्हे, तर काही कार्यकर्त्यांनी थेट आरोप केला की, “शेख आमच्या समाजाला चुरण देतात, दिशाभूल करतात!”
दरम्यान, मालेगावात वातावरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे…. या वादग्रस्त विधानाने राजकीय भूकंप घडवला असून, प्रशासनाचे उरलेले संयमाचे धागे आता तुटण्याच्या मार्गावर आहेत!….