श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-
रायगड जिल्हा सेवानिवृत्तांच्या संघटनेच्या श्रीवर्धन शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा 24 जून 25 रोजी श्री दत्त मंदिर सभागृह,श्रीवर्धन येथे सौ.रोहिणी प्र.क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सभेमध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली,नवीन सभासदांचे स्वागत,मागील सभेचे इतिवृत्त मंजुरी,वार्षिक अहवाल वाचन,पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी,वयाची सत्तर वर्षे झालेल्या सभासदांचा सत्कार करणे इ.कामकाज पार पडले.व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सौ.क्षीरसागर, कार्यवाह चंद्रकांत केळस्कर, खजिनदार दिलीप पडवळ,व कमिटी मेंबर्स स्थानापन्न होते.शाखेच्या अध्यक्षा सौ.रोहिणी प्र.क्षीरसागर यांनी सलग 21 वर्षे संघाच्या अध्यक्षपदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळून प्रकृती अस्वास्थ्यामुळे अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून त्या मुक्त होत असल्यामुळे संस्थेच्या हितासाठी त्यांनी आजवर केलेल्या यशस्वी कामकाजामुळे त्यांना कार्यक्रमात सन्मानपत्र अर्पण करण्यात आले.विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी नूतन अध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्यवाह श्री.चंद्रकांत बापू केळस्कर यांची टाळ्यांच्या गजरात एकमताने निवड करण्यात आली.अध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव शशिकांत मार्कंडे यांनी सुचविले व अरुण ठोसर यांनी अनुमोदन दिले.सभेमध्ये वयाची सत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना छत्री भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.आपणांस सातत्याने सलग 21 वर्षे काम करण्यासाठी सर्व सभासदांनी वेळोवेळी उत्तम सहकार्य केल्याबद्दल सौ.क्षीरसागर यांनी सर्व सर्वांचे ऋण व्यक्त केले.स्नेह भोजनाने वार्षिक सभेच्या कामकाजाची सांगता झाली…