चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
समाजातील सर्व घटक एकत्र आल्यावर जे शक्य नाही,ते होते,महात्मा गांधी यांच्या म्हणण्यानुसार सुरुवात आपल्यापासून होणे गरजेचे आहे…त्याचेच उदाहरण चौक दूर क्षेत्र पोलीस इमारत होय…असे गौरव उदगार रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी काढले.खालापूर पोलीस यांनी लोक सहभागातून चौक येथे नवीन इमारत उभी केली असून तिचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या…
त्या पुढे म्हणाल्या आज अनेक संस्थामधून मदत उपलब्ध झाली आहे…विशेषता पोलीस बांधव यांनी आदिवासी मुलांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत…पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी उपनिरीक्षक विशाल पवार,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे यांनी लोक सहभागातून खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक येथे नवीन दूर क्षेत्र इमारत बांधली आहे, असे सांगून ज्यांनी मदत केली त्याचे आभार व्यक्त केले…खालापूर तालुक्यातील चौक हे गाव सर्वात मोठे असून येथे आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येत आहे…त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी,आलेल्या प्रत्येक माणसाला या इमारतीचा उपयोग होईल,असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले…अंदाजे वीस लाख रुपये या इमारतीला खर्च आला आहे…
यावेळी खालापूर पोलीस यांच्या वतीने,पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप,पोलीस बांधव यांना रेनकोट वाटप, हेल्प फाऊंडेशन यांना साहित्य वाटप,पोलीस यांना वाहतुकीसाठी बॅरिकेट वाटप करण्यात आले…सरपंच रितू ठोंबरे यांनी ही मनोगत व्यक्त केले. पोलीस उप निरीक्षक विशाल पवार व पोलीस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे यांचा सन्मान पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी चौक सरपंच रितू ठोंबरे,भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी सरपंच प्रफुल्ल विचारे, ॲड.प्रभाकर सावंत, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे, हेल्फ फाऊंडेशन चे गुरुनाथ साठेलकर व त्यांची टीम,उद्योजक यासीन भालदार,कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासह चौक परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.