आषाढी एकादशीनिमित्त उरण आगारातून स्पेशल एस.टी.बससेवा… भाविकांसाठी उरण ते पंढरपूरचे तिकीट दर ६१९ रुपये…

0
10

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण आगारातून आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनसाठी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी  स्पेशल एस.टी.बस सेवा  दिनांक ४ आणि ५ जुलै २०२५  रोजी उरण  वरुन सकाळी ८.३० वाजता सुटणार आहे.सदर उरण-पंढरपूर बसचा मार्ग उरण,करळ,गव्हाण फाटा,पनवेल,स्वारगेट,सासवड,जेजुरी,फलटण,नातेपुते,माळशिरस आणि पंढरपूर राहणार आहे.

उरण ते पंढरपूरचे तिकीट दर मात्र ६१९ रुपये राहणार आहे.तसेच महिलांसाठी महिला प्रवासी सन्मान योजनेंतर्गत सर्व महिलां प्रवाशांना तिकीट दरात ५०% सवलत राहणार आहे.तरी भाविकांनी सदर सेवेचा लाभ असे आवाहन आगार प्रमुख यांनी केले आहे.