पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल ):-
खिडुकपाडा येथील भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग नेतृत्व प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थित पार पडला… या कार्यक्रमाला नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते… यावेळी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष शेठ भोईर आणि ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला… वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले… यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल प्रभुदास भोईर यांनी सर्वांचे आभार मानत पुढील राजकारण हे समाजाच्या हितासाठीच करणार असल्याचे सांगितले…