स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार…कार्यकारणी बैठकीत राष्ट्रवादी कार्याध्यक्ष समीर शेडगे यांचे सूचक…

0
7

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव) :-

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील किल्ला येथील ओम नमो शिवाय मंगल कार्यालयात
अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकारणीची बैठक मंत्री अदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली…यावेळी बैठकीत राष्ट्रवादी कार्याध्यक्ष समीर शेडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,खासदार सुनील तटकरे यांचा 10 जुलै २०२५ रोजी 70 वा वाढदिवस संपन्न होणार आहे…साहेबाना साजेसं असा वाढदिवस जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये साजरा करण्याचे आवाहन केले… तटकरे साहेबांचे देशपातळीवरचे काम लक्षात घेता प्रत्येकानी आपल्या घरातला हा एक सण असून हा दिवस साजरा करूयात…यासाठी जिल्ह्यात व तालुक्यात प्रत्येक गावामध्ये किंवा वाडी वस्ती वरती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे… त्या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय करण्यात आले..या कार्यकरणी बैठकीमध्ये ठाकरेच्या सेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला…
त्याचबरोबर विविध पदांचे नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले…यावेळेस जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या… यावेळी येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व निवडणुकीत 100% राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचे समीर शेडगे यांनी सूचक वाक्य केले…