नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
नांदगाव शहर व चांडक प्लॉट परिसराला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या नवीन पुलाचे आज सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले…हा पूल आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास आला असून नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेला आज पूर्णविराम मिळाला आहे.
रेल्वे पुलालगत असलेल्या या नवीन पुलाची मागणी चांडक प्लॉट, एस.टी. कॉलनी, गांधी नगर, भोले नगर, मार्केट परिसरातील रहिवाशांनी गेल्या अनेक वर्षांपासून केली होती.नदीला पूर आल्यानंतर या भागांचा शहराशी संपर्क तुटतो आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
मागील वर्षीच्या पुरानंतर परिस्थिती गंभीर झाल्याने अंजुमताई कांदे यांनी स्वतः भेट देऊन रस्ता व पूल पाहणी केली होती.नागरिकांच्या विनंतीची दखल घेत आमदार सुहास कांदे यांच्याकडे ही गरज पोहोचवण्यात आली आणि पुलासाठी मंजुरी मिळवून कामाला सुरुवात झाली…कार्यक्रमात बोलताना नाना जाधव यांनी हा पूल परिसरासाठी “संजीवनी” असल्याचे म्हटले. सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव शहराचा झपाट्याने विकास होत असल्याचे नमूद केले.
स्वतः अंजुमताई कांदे यांनी भावनिक शब्दांत नागरिकांच्या विश्वासाबद्दल आभार मानले आणि सांगितले की,आपल्या समस्या म्हणजे आमचे कर्तव्य… हा पूल फक्त विकास नव्हे,तर नात्यांची पूर्तता आहे.”
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष,नगरसेवक परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा पूल केवळ संरचना नाही तो आहे नागरिकांच्या विश्वासाचा दुवा!