उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत जेएनपीए (न्हावा शेवा) बंदरात मोठी कारवाई करत पाकिस्तानातून बेकायदेशीर दुबई मार्गाने आयात करण्यात आलेल्या ३९ कंटेनरची जप्ती केली आहे…. या कंटेनरमध्ये सुमारे १११५ मेट्रिक टन माल असून, त्याची किंमत सुमारे ९ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली….
२ मे २०२५ रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानातून वस्तूंच्या आयात-निर्यातीवर सर्वसमावेशक बंदी लागू केली होती…. पूर्वी अशा वस्तूंवर २००% पर्यंत आयात शुल्क आकारले जात होते मात्र, काही व्यापाऱ्यांनी हे धोरण चुकवण्यासाठी वस्तूंचे मूळ देश चुकीचे घोषित करून आणि शिपिंग कागदपत्रांत फेरफार करून त्या दुबईमार्गे भारतात आणण्याचा प्रयत्न केला….
तपासणीत असे उघड झाले की माल कराची बंदरातून दुबई येथे पाठवण्यात आला आणि नंतर जबल अली बंदर मार्गे भारतात कंटेनर दोन टप्प्यात वाहून नेले गेले – प्रथम पाकिस्तानातून दुबई आणि नंतर दुसऱ्या जहाजाद्वारे भारतात. ही मूळ लपविण्याची योजनाबद्ध पद्धत असल्याचे डीआरआयच्या तपासात सिद्ध झाले आहे….
या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये पैशांचे हस्तांतरण आणि पाकिस्तानी संस्थांशी संबंध यांचादेखील तपास सुरू आहे…. यामुळे केवळ आर्थिक नियमच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो… यामागे पाकिस्तानी व युएई नागरिकांचे गुंतागुंतीचे नेटवर्क असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे….
यापूर्वीच्या ‘ऑपरेशन सिंदूर प्रमाणेच याही वेळी डीआरआयने डेटा विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सजगतेने पावले उचलली, ज्यामुळे ही मोठी कारवाई शक्य झाली. एका आयातदाराच्या भागीदारास अटक झाली असून, इतर संशयितांची चौकशी सुरु आहे….