‘हिंदी सक्ती’ जी आर रद्द केल्यामुळे रायगड मधील मनसे सैनिकांकडून आनंद… शाळेतील विद्यार्थांना लाडू देऊन साजरा केला आनंदोत्सव…

0
42

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत) :-

मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून एकत्रितपणे हिंदी सक्ती मुद्दा घेऊन विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते…. या आक्रमक भूमिकेकडे पाहून सरकारने सपशेल माघार घेतली… मराठी माणसाचा हा विजय झाल्यामुळे मनसे सैनिकांनी आज आनंदोत्सव सुरू केलाय…. सरकारने अखेर या मुद्द्यावरून माघार घेतल्यानंतर रायगडमधील मनसे सैनिकांनी सुद्धा नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटी या मराठी शाळेत जाऊन पहिली ते चौथी माध्यमातील विद्यार्थ्यांना आज लाडू देऊन आनंद साजरा केला… यावेळी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे व रोहा तालुक्यातील मनसे सैनिक उपस्थित होते….