न्यू इंग्लिश स्कूल रावढळ या विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न…

0
7

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे ) :-

रावढळ दिनांक 26 जून न्यू इंग्लिश स्कूल रावढळ या विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती संपन्न झाली… त्यानिमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले…. प्राध्यापक देशपांडे सर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली…. या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी पास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना पासचे वाटप करण्यात आले…. हे वाटप एसटीच्या अधीक्षक सौ. मिंढे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले…. त्याबद्दल त्यांचे विद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले त्याचबरोबर आभार मानण्यात आले. गेली अनेक वर्ष विद्यालयातील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळवून देणारे प्राध्यापक देशपांडे सर यांचेही अभिनंदन यावेळी करण्यात आले…. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष दवंडे सर यांनी केले….