उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-
शिवसेना पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे.ग्रामीण भागात सर्वच नागरिकांसोबत संवाद साधण्याचा महत्त्वाचा दुवा शाखाप्रमुख आहे.शिवसेनेचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवायचे असेल तर शाखाप्रमुखांनी मतदारांशी, नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधून शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे.त्यासाठी शाखाप्रमुख पद व त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र कालांतराने शाखाप्रमुख हा काम करीत नसल्याने कमकुवत झाला.त्या त्या भागातील नागरिकांशी मतदारांशी त्यांच्या संवाद तुटला आहे. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो तिथे मात्र शाखाप्रमुख पाहिजे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीत त्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे.शाखा प्रमुखाचे ग्रामीण भागात खूप मोठे योगदान आहे हे कोणी विसरून चालणार नाही आता मात्र शाखाप्रमुखांना चार्ज करायची वेळ आली आहे.असे परखड व आक्रमक मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे मांडले…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोट बांधण्यासाठी व पुढील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप येथे करण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव बोलत होते.भास्कर जाधव यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर,कोकण युवासेना प्रमुख-शिरसाठ,जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर,जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील,उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत,रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते,रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर,जिल्हा निहाय वक्ता मनीषा ठाकूर,रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी,खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे,संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, मेघा मिस्त्री, ज्योती म्हात्रे- संघटिका,शिव विधी व न्याय सेवा उरण तालुका वर्षा पाठारे, उरण तालुका संघटक बी एन डाकी, पनवेल तालुका प्रमुख महेंद्र गायकर,उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, संपर्क प्रमुख दिपक भोईर,द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर,शहर संघटक महेश वर्तक,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार घरत,उरण शहर संघटक संदीप जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…
या मार्गदर्शन मेळाव्याला उरण-पनवेल खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरला होता.महिला भगिनींचीही उपस्थिती लक्षणीय होती…अतिशय सुंदर व जोशपूर्ण असा हा मार्गदर्शन मेळावा होता…या मेळाव्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता..या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्याचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या मेळाव्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.