रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत असून गेल्या आठ दिवसांत मुरुड तालुक्यातील शिघ्रे तपासणी नाका येथे अलवान निभार दफेकर (वय १९ वर्षे रा.मुरुड जि. रायगड) याच्याकडून तीन लाख अठ्ठ्यांऐंशी हजार रुपये किमतीच्या अंमली पदार्थ (चरस)सहित वीस हजार रुपये किमतीची मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे… याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार जनार्दन मोतीराम गदमले यांनी दिली आहे…
याबाबत सविस्तर माहिती अशी की,रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिघ्रे तपासणी नाका येथे आज रात्री एक वाजून एकेचाळीस मिनिटांच्या सुमारास आरोपी अलवान निभार दफेकरहा त्याच्या ताब्यात असलेली एम.एच. ४८ वी.के. १२५१ ची राखाडी रंगाची सुझुकी मोटर सायकलच्या डिक्कीमध्ये २,४२,०००/- रु किंमतीचे एकखाकी रंगाच्या प्लास्टीक चिकटपटटीमध्ये गुडांळलेल्या अवस्थेत ४८४ ग्रॅम वजनाचे काळसर, हिरवटओलसर चरस, १,४६,०००/- रु किंमतीचे एकखाकी रंगाच्या प्लास्टीक चिक्टफ्टटीमध्ये गुडांळलेल्या अवस्थेत एक अर्धवट फोडलेले पाकीट २९चीम वजनाचे, त्यामध्ये काव्ळसर, हिरवट ओलसर चरस,तसेच वीस हजार रुपये किंमतीची मोटर सायकल असा एकूण चार लाख आठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी अलवान निभार दफेकर ताब्यात घेण्यात आले आहे… याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख करीत आहेत…