“कृषी दिन म्हणजे शेतकऱ्यांचा गौरव दिन” :तहसीलदार महेश शितोळे…महाड शहरामध्ये “कृषि दिंडी” मोठ्या उत्साहात संपन्न

0
5

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे ) :-

1 जुलै हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे… या कृषि दिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न कृषि महाविद्यालय महाडच्या वतीने कृषि दिंडीचे आयोजन उत्साहात संपन्न झाले…. कृषि दिन निमित्ताने श्री. विरेश्वर महाराज मंदिर येथून प्रारंभ झालेली कृषि दिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होवून बस स्थानक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे चवदार तळे पर्यंत नियोजन बद्ध रित्या काढण्यात आली…  दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले….

याप्रसंगी महाडचे विद्यमान तहसीलदार महेश शितोळे, महाड तालुका कृषि अधिकारी धीरज तोरणे, मोहोप्रे चे सरपंच अनंत कदम, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  यू. पी. कोकाटे, कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सविता यादव, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या ए. एम. शेख, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. राहुल डुंबरे, डॉ. अमोल तांगडे, होप फाउंडेशन चे  नरेंद्र महाडीक, समाजसेवी  प्रमोद महाडीक, पर्यावरण प्रेमी नवीन परमार, महिला समाजसेवी नीता शेठ, समाजसेवक गणेश खातू, रोटेरियन प्रा. अपूर्वा देसाई, रोटेरियन  जगदीश वर्तक, कृषि मित्र  राजेंद्र जैतपाल,  राषट्रीय सेवा योजना समन्वयक (NSS)- प्रा. संदिप संकपाळ ( कृषि महाविद्यालय) व प्रा. मयुरी मोरे (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय) आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष  व्ही. जी. चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती…. रोटरी आणि लायन्स क्लब चे नवीन वर्ष सुद्धा 1 जुलै पासून सुरु होते….  या अनुषंगाने सामाजिक जाणीवेने प्रेरित होवून समाजोपयोगी उपक्रम राबविल्या बद्दल रोटरी क्लब ऑफ महाड चे माजी अध्यक्ष रोटेरिअन अरुण गावडे, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट च्या माजी अध्यक्ष रोटेरिअन मनीषा नगरकर आणि लायन्स क्लब ऑफ महाड च्या माजी अध्यक्ष मंजुषा कुद्रीमोती यांना सन्मान चिन्ह आणि रोपटे देवून गौरव करण्यात आला…. सूत्र संचालन प्रा. विद्या पवार यांनी केले…. कृषि दिंडी मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि महाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….