अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
आपल्याकडे अथवा आपल्या घरात असणाऱ्या व्यक्तीच्या पदाचा दुरुपयोग करीत कामात अडथळा आणण्याचे अनेक प्रकार हे सर्रास घडत असतात…. असाच एक प्रकार अलिबाग तालुक्यातील पेढांबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडल्या प्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात पेढांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचा सुपुत्र रोहित पाटील, स्वरूप पाटील (दोघेही राहणार पेढांबे, तालुका अलिबाग, रायगड) तसेच त्यांचे दोन अन्य सहकारी यांच्या विरोधात विजय सिद्धेश्वर गायकवाड (वय ३७ वर्षे, राहणार भाल, मराठी शाळेजवळ तालुका व अलिबाग, रायगड) यांनी दिली आहे….
रायगड जिल्ह्यातील कार्ले खिंड हाशिवरे दरम्यान असणाऱ्या पेढांबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मौजे केतकीचा मळा येथे उमेश गुप्ता नामक मुंबईतील धनाढ्य व्यक्तीने जागा खरेदी करीत संपादित केली आहे…. सदर जागा ही डोंगर माथ्यावर आहे… सदर ठिकाणी सागर पवार यांच्या मार्फत विजय गायकवाड हे काम पाहत आहे…. सदर ठिकाणी ठेकेदार सागर पवार यांच्या मालकीचे डंपरद्वारे खडी डबर व इतर साहीत्याची ने-आण सुरू असते…. सदर ठिकाणी मागील दोन वर्षापासुन काम करीत असल्याने विजय गायकवाड हे तेथे राहणाऱ्या ग्रामस्थ यांना ओळखतात… उमेश गुप्ता यांचे मालकीच्या जागेमध्ये ठेवण्यासाठी ट्रेलरमध्ये कंटेनर आणले होते…. ते उतरवून घेण्यासाठी सदरचे कंटेनर ट्रेलर मधुन खाली उतरविण्यासाठी फिर्यादी यांनी पेण तालुक्यातील वडखळ येथील भाड्याने हायड्रा मागविला होता…. हायड्रावर जागेत घेऊन गेले असता पेढांबे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांचा सुपुत्र रोहित पाटील त्याचा सहकारी स्वरुप पाटील तसेच अन्य सहकारी हे गुप्ता यांच्या मालकीच्या जागेच्या ठिकाणी एकत्र आले…. त्यांनी त्यांच्याताब्यात असलेले चार चाकी वाहन क्रमांक एम एच ०६ सी जी ०७०७ रस्त्यात उभे करून जाण्या येण्याचा मार्ग बंद केला… यावेळी फिर्यादी विजय गायकवाड यांनी रस्त्यात उभी केलेली गाडी बाजुस घेण्यास सांगितले असता, ” तु तुझ्या शेठला येवुन मला भेटायला सांग.” त्यानंतर मी गाडी काढतो येथुन पुढे तु काम करायला यायचे नाही… काम करायला आलास तर मार खाशील अशी धमकी आरोपी रोहित पाटील व स्वरूप यांनी फिर्यादी विजय गायकवाड यांना दिली. तसेच त्यांच्यात शाब्दिक वाद झाले… गायकवाड यांना शिवीगाळी करण्याबरोबरच दमदाटी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला….
महिला सरपंच यांच्या सुपुत्र रोहित पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ६०/२०२५, भा.न्या.सं. २०२३ चे कलम १८९ (८), ३५१ (२), ३५२, १२६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोयनाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राजेंद्र म्हात्रे हे करीत आहेत…