महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
महाड तालुक्यातील चिंबावे येथील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत सध्या एकच शिक्षिका कार्यरत असून, शाळेवर आणखीन एक शिक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी चिंबावे ग्रामपंचायतीने महाड पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे… चिंभावे येथील उर्दू शाळेत इयत्ता पहिली पासून सातवी पर्यंतचे वर्ग आहेत… या शाळेची पटसंख्या 16 आहे… मात्र या सोळा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एकच शिक्षिका कार्यरत आहे तीही नवीन आहे… त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे… केंद्र प्रमुखांकडे वारंवार विनंती करूनही त्यांनी ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले…
याबाबत चिंबळमोला ग्रामपंचायतीने महाड पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शाळेवर आणखीन एक शिक्षक नेमण्याची विनंती केली आहे… केंद्रप्रमुख जुवले यांनी वारंवार पत्र देऊनही त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले… यापूर्वी शाळेत एकच विद्यार्थी असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आज रोजी शाळेत 16 विद्यार्थी असल्याने या शाळेत एक शिक्षक नेमण्याची मागणी चिंभावे मोहल्याचे अध्यक्ष मकबूल चांदले यांनी केली आहे….