रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहे शहरात असलेल्या वरसे येथील चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशन ट्रस्ट यांच्या लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल्स मॅनेजमेंट अँड बिसिनेस स्टडीज या महाविद्यालयात संस्थेचे सर्वेसर्वा उदय कोंडे यांच्या जन्मदिनाने औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले…
उदय जी कोंडे हे रोह्याचे सुपुत्र असून, यांनी केमिकल इंजिनीरिंगमध्ये ग्रॅज्युएशन व नंतर बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर करून आज ते गुजरात मधील ऍग्रो कंपनीत, CEO या उच्च पदावर काम करीत आहेत…. आपण शिक्षण घेऊन मोठे झालो, शिक्षण ही काळाची गरज आहे, याकरिता ज्या मातीत मी जन्माला आलो, त्या मातीचे ऋण फेडण्याकरिता येथील मुलांना उच्च शिक्षण घेऊन व्यवसाय संधी मिळण्याकरिता ” श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशन ट्रस्टची” स्थापना करून लीलावती इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय सुरू केले…. सवलतीच्या व माफक दरात आज कोकणातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत… अनुभवी शिक्षक सुसज्ज इमारत यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा ओघ वाढला आहे…. आज चंद्राबाई कोंडे एज्युकेशन ट्रस्ट शिक्षणात गरुड भरारी घेत आहे…. रोहे शहरात एका उत्तम हॉटेलची कमतरता होती, हे लक्षात घेऊन व त्यांनी, रोहेकारांकरिता हॉटेल लीलाची निर्मिती केली, आज या हॉटेलला रोह्यातील तसेच परदेशातील ग्राहकांनीही पसंती दिली आहे….
ट्रस्ट विश्वस्त उदय जी कोंडे यांच्या वाढदिवसा निमित्त महाविद्यालयात आवारात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला…. यावेळी उपस्थित रोहेकर फाउंडेशनचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग, स्टाफ, विद्यार्थी, मित्रपरिवार ,कोंडे परिवार, पत्रकार मित्र यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या…