खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
मुस्लिमांमध्ये आशुरा दिवसाला विशेषत: खूप महत्त्व आहे.रविवार दि.०६जुलै २०२५ रोजी खालापूर तालुक्यातील हाळ – खुर्द, हाळ – बुद्रुक,खोपोली, शिळफाटा सह हाळ गावातील मुस्लिम बांधवानी मोहरम म्हणजे आशुरा दिवस साजरा केला… हाळ बुद्रुक व हाळ-खुर्द गावातून ताजीया व पंजतनपाकचा नक्षा हातात घेत या हुसेन मौला हुसेन एक नारा हायदरी या अली या अलीची घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात,नातशरीफ पडत जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गांवर शेकडो मुस्लिम बांधवाच्या उपस्थिती मिरवणूक काढण्यात आली… यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता… शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन (करबला )यांच्या आठवणीत शहरा सह गावातील घराघरांत दहा दिवस मजलिश, कुराण खोनी,फातिहा खोनी पठण आशुरा दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून मुस्लीम बांधवांकडून घराघरांमध्ये विशेष खाद्यपदार्थ तयार करून फातिहापठण करण्यात आले .शरबत,खीर, खिचडा आणि जेवण ठेवण्यात आले होते. या दोंन दिवशी लहान मोठ्या सह अनेकांनी पूर्ण दिवस भर रोजे (उपवास )पकडले होते… गोर गरिबांना सदका (पैसे )कपडे, जेवण, फुरूट वाटप करण्यात आले.तेसच मस्जिद मध्ये नमाज आदा करून कुरानचे पाट करीत सर्वानच्या सुख समाधाना साठी दुवा (प्रार्थना )करीत मोहरम साजरा करण्यात आला.
मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव आहे. मोहरम महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद गंबर(सल्लाहूंआलेहीस्लम ) यांचे नातू हासन – हुसैन आणि त्यांचे कुटुंब सह ७२ जण हे करबला येथे शहीद झाले होते.त्यांच्या आठवणीत मुस्लिम बांधव दहा दिवस घरा घरातील मजलिश आणि कुराणचे पठण करून फातिहापठण करीत सर्वांसाठी प्रार्थना करून इमामे हुसैन करबला शहीद यांची माहिती आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्याना सांगत नियाज वाटप करून साजरा करतात…