रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव ) :-
रायगडचे खासदार मा. सुनिलजी तटकरे यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त,”माझे नेते, माझा अभिमान” या संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक मुक्त रोहा या उपक्रमाला आषाढी एकादशीच्या पावन दिवशी सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत ५००० ज्युट पिशव्या वाटण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. आदितीताई तटकरे व मा. आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी केली असून,नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाअंतर्गत ५००० पेनांचेही वितरण करण्यात येणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये स्वच्छता,पर्यावरणसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकी याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
संपूर्ण रोहा शहरात या उपक्रमाचे स्वागत होत असून नागरिकांनी प्लास्टिकच्या ऐवजी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले…