रायगडच्‍या कोर्लई किनारयावरील संशयीत बोटीसंदर्भात महत्‍वपूर्ण खुलासा… ती बोट नसून फलोटींग बोया असल्‍याचे स्‍पष्‍ट…

0
14

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :-

मुरूडच्‍या कोर्लई समुद्रकिनारी आढळून आलेल्‍या संशयित बोटीचा उलगडा झाला असून, ती बोट नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे…. ती संशयास्‍पद वस्‍तू म्‍हणजे मासेमारीसाठी वापरण्‍यात येणारा बोया असल्‍याचं समोर आलं आहे…. त्‍यामुळे सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे…. तटरक्षक दलाच्‍या शोधमोहीमेत ही बाब स्‍पष्‍ट झाली असून, रायगड पोलीसांनी याबाबतचा खुलासा केला आहे…. मच्‍छीमार आपली जाळी बुडू नयेत यासाठी हे तरंगते बोया वापरतात…. संशयास्‍पद वस्‍तू म्‍हणजे तोच फलोटींग बोया असून, पाकिस्‍तानी मच्‍छीमारांचा बोया भारतीय समुद्र हद्दीत वाहून आलेला आहे…. अशाच प्रकारचा पाकीस्‍तानी तरंगता बोया जानेवारी महिन्‍यात गुजरातच्‍या ओखा किनारी आढळून आला होता…. रविवारी रात्री संशयित पाकीस्‍तानी बोट कोर्लई जवळच्‍या समुद्रात आली असल्‍याचा संदेश तटरक्षक दलाने दिला होता…. त्‍यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती…. आता मात्र ती बोट नसून, बोया असल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडलाय….