स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी बाळासाहेब खाडे यांची श्रीवर्धन येथे तडकाफडकी बदली…

0
17

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-

रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची श्रीवर्धन पोलिस ठाण्याच्या प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे…. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे कार्यभार पाहत असताना त्यांनी कर्तव्यात केलेल्या गंभीर स्वरूपाच्या कसुरीच्या अनुषंगाने सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ०२ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न (२) मध्ये केलेल्या दुरुस्ती नुसार जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार जनहितार्थ व प्रशासकीय कारणास्तव रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे बदली करण्यात आली असल्याने रायगड पोलिस दलात आनंद व्यक्त केला जात असतानाच पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांचे देखील मनोमन कौतुक देखील केले जात आहे….
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी बाळासाहेब बाबुराव खाडे यांच्या पदाचा कार्यभार नियंत्रण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद प्रल्हादराव खोपडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे… पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्याची नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त होत असताना त्यांच्याकडील प्रलंबित गुन्हे, अर्ज, प्रकरणी कामे लेखी स्वरुपात पोलिस निरीक्षक मिलिंद प्रल्हादराव खोपडे, सुपुर्द करुन नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिनांक ७जुलै २०२५रोजी काढले आहेत….
बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातून बदली झालेल्या काही कर्मचारी यांच्यापैकी दोघांना पेंडिंग गुन्हे काढण्याच्या निमित्ताने पुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात पाचारण करण्यात आले होते… पाचारण करण्यात आलेले कर्मचारी यांनी आम्ही कुठेही गेलो तरी परत येणार, अशी या आवेशात पोलिस अधीक्षक कार्यालयात वावरत होते….
पूर्वीचे अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष सुस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्याशी असलेले संबंध लक्षात घेता तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अनेक तक्रारी असुन सुद्धा बाळासाहेब खाडे यांच्याविरोधात गुन्हेशोध व इतर माध्यमांनी सातत्याने आवाज उठवूनही त्याकडे केवळ जाणीवपूर्वक कानाडोळा केला असल्याची चर्चा देखील पोलिस अधीक्षक कार्यालयात सुरू आहे…. या काळात खंडणी वसुली, आर्थिक लाचारी आणि अवैध धंद्यांचे रक्षण हेच प्रमुख कामकाज झाले असल्याचा ठपका आहे…. गृह विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये याची नोंद असूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती…..
बाळासाहेब खाडे यांच्या कार्यालयाच्या दरवाज्यामध्ये काच बसविण्यात आली होती, मात्र त्यांनी त्या काचेला आतील बाजूने पांढऱ्या रंगाचे कागद अथवा कपडा लावलेला आहे…. तसेच त्यांच्या कार्यालयाबाहेर कोण येत आहे, जात आहे हे पाहण्यासाठी सी सी कॅमेरा बसविला गेला तसेच त्यांना कोणाला भेटायचे असेल तर त्यांना संपर्क साधल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचारी येवून त्या दरवाज्याचा लॉक उघडून दिल्या नंतरच प्रवेश मिळत होता…. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक यांच्या सहित बाळासाहेब खाडे सोडून जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयाला आजपर्यंत ते आत मध्ये असताना लॉक लावण्याची पद्धत नव्हती… मात्र ही बाब तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना माहीत असताना देखील त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही…..
पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी ज्या ज्या ठिकाणी कार्य केले तेथील काही प्रमाणात काम देखील चांगल्या प्रकारे केले आहे तसेच काही प्रमाणात वादग्रस्त देखील होते…. पोलिस अधीक्षक कार्यालयात अजून काही अधिकारी कर्मचारी हे पोलिस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या वरदहस्तमुळे पोलिस खात्यात लागल्यापासून निवृत्त होण्यास वर्ष होण्यास शिल्लक असताना देखील पोलिस अधीक्षक कार्यालयात भुजंगासारखे स्थान मांडून बसलेले आहेत…. यांच्या बदल्या कधी होणार? ठाण मांडून बसलेला एक कर्मचारी याने काही पोलिस कर्मचारी यांचीच फसवणूक केली असल्याची देखील चर्चा जोरदार सुरू आहे…. त्या कर्मचारी विरुद्ध कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तरी हा त्याच्या विरोधात खोटे निनावी अर्ज करणार आणि महासंचालक कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी यांच्या वरदहस्तमुळे निनावी केलेल्या अर्जाची देखील चौकशी करून नाहक त्रास दिला जात असल्याची चर्चा देखील सुरू आहे….