दुगारवाडी धबधबा पुन्हा एकदा ठरला मृत्यूच्या खाईसारखा!… धबधब्यावर मृत्यूच्या छायेत अडकले पर्यटक!…

0
13

नाशिक शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे) :- 

नाशिकजवळील दुगारवाडी धबधबा पुन्हा एकदा मृत्यूच्या खाईसारखा ठरला! सहलीला गेलेल्या पर्यटकांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं… अक्षरशः मृत्यू समोर उभा राहिला! पण वेळेवर आलेल्या जवानांनी जिवाची बाजी लावत थरारक रेस्क्यू करत त्यांना वाचवलं!

धबधब्याच्या दुसऱ्या बाजूस अडकलेले पर्यटक, आजूबाजूला खोल दरी, वेगाने वाहणारा पाण्याचा लोट आणि निसरडा रस्ता हे सगळं जीवघेणं होतं…. पण वनविभाग, पोलीस आणि स्थानिक जवानांच्या कमालीच्या धाडसामुळे सर्व पर्यटक सुखरूप बाहेर काढले गेले!

पावसाळ्यात धबधबा परिसरात जाण्याआधी हवामान खात्याचा अंदाज घ्या!, पाणी वाढत असल्यास ताबडतोब सुरक्षित स्थळी जा!, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका!,  निसर्गाचा आनंद घ्या, पण त्याच्या लाटांशी पंगा नको! असा प्रशासनाने इशारा दिला आहे…