अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन तसेच दिनांक १ ते ७ जुलै दरम्यान आयोजित कृषी सप्ताहाचा समापन कार्यक्रमही उत्साहात पार पडला….
कृषिदिनी सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांच्या हस्ते कै.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले….
यावेळी वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील, कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, कीटक शास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत, कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, कनिष्ठ कृषी विद्यावेत्ता डॉ. नामदेव म्हसकर, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. राजेंद्र सावळे, कृषी पर्यवेक्षक महेश घारपुरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते….
कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कै.वसंतरावजी नाईक यांच्या जीवनपटाचा नेटक्या शब्दात आढावा घेतला… त्यांच्यामुळेच अन्नधान्य, दुग्धोत्पादन, कृषि शिक्षण, सिंचन, वीज प्रकल्प, ग्रामविकास इ. क्षेत्रात राज्य अग्रेसर झाल्याचे सांगत ते आधुनिक महाराष्ट्राचे महानायक होते, असे त्यांनी नमूद केले….
जयंती व कृषि सप्ताहाचे औचित्य साधून कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, भात पैदास विभाग, कृषिविद्या प्रक्षेत्र आणि एम.ए.ई. प्रक्षेत्रावर शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध वृक्षांचे सामूहिक वृक्षारोपण केले…. डॉ. वाघमोडे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले व प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन हिरीरीने करण्याची गरज प्रतिपादित केली….
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी भात पैदास विभागाच्या प्रक्षेत्रावर डॉ. वाघमोडे यांनी नारळ वाढवून पैदासकार कर्जत-५ बीजोत्पादन प्लॉटचे पूजन करून लावणी करून कृषी सप्ताहाचे यशस्वी समापन करण्यात आले…. यावेळी कृषी विद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने,वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ.मीनाक्षी केळुसकर, कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई,वरिष्ठ संशोधन छात्र अनिरुद्ध मदने उपस्थित होते….