माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर काळाचा घाला… हैदराबादच्या पर्यटकांच्या वाहनाचा माथेरान घाटात ब्रेक फेल…

0
13

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

हैदराबादवरून माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एर्टिगा कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला.वाहनात सहा प्रवाशी होते…यातील पाच प्रवाशी जखमी झाले असून एक सुखरूप आहे..जखमींमध्ये दोन मुले तर तीन मुली असा समावेश आहे…जुमापट्टी रेल्वे स्थानकातील पहिल्या रेल्वे क्रॉसिंग मार्गावरच वाहनाला घाट उतरत असताना अपघात घडला…कार लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकून थेट रस्त्याच्या खालच्या वळणावर हवेत उडून सिमेंट सुरक्षा कठड्याला धडकली.यामध्ये कारचे एयर बॅग उघडल्याने वाहनातील समोरील पर्यटक थोडक्यात जखमी झाले. काळ आला होता परंतु वेळ आली नसल्याने पर्यटकांचे प्राण वाचले.

याबाबत सविस्तर घटना अशी की हैदराबाद राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील राहणारे साकेत राम,रेयूत त्रिलोक,काशू तेजस्विनी, रेहुक पूजिता, रेव्ह वैष्णवी,तेजस्वी इम्कोरल ह्या सहा जणांचा एक ग्रुप माथेरान फिरण्यासाठी म्हणून 4 जुलै रोजी आपल्या अर्टिगा कारमधून निघाले होते.दरम्यान सात जुलै रोजी हे तरुण माथेरान येथे दुपारी वस्तीला पोहचले. माथेरान फिरून झाल्याने आज ही तरुण आपल्या कार मधून परतीच्या प्रवासाला निघाले होते.या तरुणांमध्ये चार मुली आणि दोन मुले असा सहा जणांचा ग्रुप होता.यामध्ये त्रिलोक हा वाहन चालवत होता.माथेरान घाट उतरत असताना दुपारी बारा वाजता जुमापट्टी या रेल्वे स्थानकाच्यावरील पहिला रेल्वे क्रॉसिंग येथे तीव्र उतारावर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने त्रिलोकचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार प्रथम रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकली ही धडक एवढी भीषण होती की कार हवेत झेप घेत खालच्या वळणावरील सिमेंट कठड्याला धडकली.यामध्ये सिमेंट कठड्याचे दोन भाग होऊन खोल दरीच्या भागात तुटून पडले… तर कार रस्त्यावर उलटी पडली होती.यावेळी घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.परंतु अर्धातास अपघातग्रस्त पर्यटकाना कुठलीही मदतच मिळाली नसल्याचे समोर आले आहे.नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांना अपघाताची माहिती मिळताच ढवळे आपल्या पोलिस साथीदारांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.वाहनातील साही प्रवाशी हे वाहनात अडकून होते.यावेळी ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून स्थानिक टेक्सी चालकांच्या वाहनात बसवून रायगड हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचारासाठी दाखल केले.

हा अपघात एवढा भीषण होता की वाहनातील सुरक्षा एअर बॅग ओपन झाल्या होत्या यामुळे चालक आणि समोरील व्यक्ती दैवबलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले.या अपघातात तीन तरुणी आणि दोन तरुण जखमी झाले असून सहावी तरुणी सुखरूप होती.जखमी तरुणांच्या डोक्याला आणि हाताला पायाला जखम झाली असून अधिक उपचार डॉक्टर करीत आहेत.