मुंबईनंतर अलिबागमध्ये मनसे आक्रमक… परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी माणसाला चेतावणी देणारा स्टेटस…

0
12

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-  

मुंबईत सकाळपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मीरा रोड परिसरात मोठा मोर्चा सुरू आहे परप्रांतीय व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला जशास तसे उत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला मराठी माणसाला डीवचण्याच काम सुरू सुरू आहे. असाच प्रकार आज अलिबाग मध्ये घडला अलिबाग बाजार चे मालक यांनी आपल्या वॉट्स अप स्टेटस वर एक मराठी माणसाला डीवचण्यासारखा मेसेज ठेवला यानंतर अलिबाग मधील मनसे सैनिकांनी थेट अलिबाग बाजार मध्ये जाऊन या व्यक्तीला जाब विचारला त्यानंतर सदर घटनेबाबत या व्यक्तीने ? महाराष्ट्र सैनिकांची माफी मागितली आहे.