वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात… अपघातात वाहन चालक सुखरूप बचावला…

0
10

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यातील महाड शहरानजीक एका वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला असून वाहन चालक हा सुखरूप आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महाड शहरापासून काही अंतरावर सोलापूर येथून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे येणाऱ्या आज दिनांक ९ जुलै २०२५रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ट्रेलर क्रमांक एन एल ०१ ए एफ १६४६वरील चालक संतोष मिश्रा नामक चालक याचे  त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे.या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून वाहन चालक संतोष मिश्रा (कानपूर, उत्तर प्रदेश) हा सुखरूप आहे.