पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पेण शहरातील साई मंदिरातून समई व घंटा चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावत पेणच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तब्बल ५ दिवसांच्या अथक तपासानंतर रेवदंडा येथील सराईत चोराला अटक केली आहे… पेण पोलिसांनी महेश चायनाखवा या आरोपीला खारपाडा येथे एस.टी. बसमधून अटक केली…आरोपीने पेण सह रायगडातील अन्य मंदिरांतूनही चोरी केल्याची कबुली दिली आहे…
पेण पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ दरम्यान साई मंदिर, कासार तलाव, पेण येथे चोरीचा प्रकार घडला होता… मंदिरातील एक समई व दोन घंटा चोरीस गेल्याने पेण पोलीस ठाण्यात BNS ३०५ (D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे… शहरातील १५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून एक अनोळखी आरोपी दिसून आला…त्याने गुन्ह्यानंतर पेण एस.टी. स्थानकातून पनवेलकडे प्रस्थान केले असल्याचे आढळून आले…
या आधारे तपास पथकाने आरोपीचा मागोवा घेतला असता तो रेवदंडा येथील महेश नंदकुमार चायनाखवा असून तो अलिबाग कारागृहातून नुकताच सुटल्याचे निष्पन्न झाले आहे… त्याचा फोटो सीसीटीव्ही फुटेज सोबत जुळवला असता, साम्य दिसून आल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले… अखेर तांत्रिक पद्धतीने पत्ता शोधून २५ जुलै २०२५ रोजी खारपाडा येथे एस.टी. बसमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे… चौकशीत त्याने पेण, वडखळ, रोहा, दादर सागरी व कोलाड येथील मंदिरांतून समई व घंटा चोरी केल्याची कबुली दिली आहे… त्यास न्यायालयात हजर केले असता २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे…
सदर गुन्याचा तपास पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निलेश राजपूत, ASI राजेश पाटील, HC सुशांत भोईर, HC प्रकाश कोकरे, HC अजिंक्य म्हात्रे, HC सचिन वस्कोटी, PN अमोल म्हात्रे, PC गोविंद तलवारे व PC संदीप शिंगाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली… असून या प्रकरणाचा अधिक तपास पेण पोलीस करत आहेत…