माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
GAIL (India) Limited च्या CSR निधीतून माणगाव नगरपंचायत हद्दीत सौर हायमास्ट व सौर पथदिवे लावण्यासाठी २.५ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ माणगाव बाजारपेठ येथील महाड बँक समोर शनिवार दि.२६ जुलै २०२५ रोजी पार पडला…या कार्यक्रमाचे भूमीपूजन खा.सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते झाले… दरम्यान कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार मा.अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला… कार्यक्रमास माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. राजीव अशोक साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्षा श्रीमती शर्मिला शोभन सुर्वे, मुख्याधिकारी संतोष माळी, तसेच स्थायी समिती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व युवक कल्याण समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, नामनिर्देशीत नगरसेवक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे, नामांकित व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, लक्ष्मण बाळा दळवी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि नगर पं. चे सर्व कार्यलीन अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… या प्रकल्पाअंतर्गत माणगाव शहरातील विविध भागांमध्ये सौर ऊर्जा वापरून चालणारे तसेच ३० हायमास्ट दिवे आणि १४४ पथदिवे बसवले जाणार आहेत… जे ऊर्जा-बचत, पर्यावरणपूरकता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत… माणगावसारख्या निमशहरी भागात सौरऊर्जेचा प्रभावी वापर ही काळाची गरज बनली आहे… GAIL सारख्या नामांकित कंपनीच्या CSR माध्यमातून राबविण्यात येणारा हा २.५ कोटी रुपये खर्चाचा सौर ऊर्जा प्रकल्प ही केवळ एक सुविधा नसून, शाश्वत आणि स्मार्ट शहरनिर्मितीच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे… या प्रकल्पामुळे शहरातील वीजबिलात लक्षणीय बचत होईल, हरित ऊर्जा वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये चांगली प्रकाशयोजना राहिल्यामुळे नागरिकांची सुरक्षितताही वाढेल… GAIL चा सहभाग, स्थानिक प्रशासनाचा पाठिंबा आणि लोकप्रतिनिधींची सक्रिय भूमिका यामुळे हा प्रकल्प यशस्वीतेकडे वाटचाल करणारा आदर्श नमुना ठरेल… कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिटी कॉर्डिंनेटर अतुल जाधव सह सर्व स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतले…