माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
रायगड जिल्ह्यातील माणगांव येथील एक अत्यंत प्रतिष्ठित सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाणारी “अमरदीप संस्था” यांच्यावतीने रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी माणगाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…. दीर्घ काळानंतर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला…. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरासाठी सुरुवातीस २५० आदिवासी लाभार्थ्यांची नोंद अपेक्षित होती…. मात्र, केवळ एका तासातच ही संख्या पार झाली आणि दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल ३५० हून अधिक लाभार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला….. यानंतरही शेजारच्या तालुक्यांमधून नागरिकांचा ओघ चालूच होता…. हे वैद्यकीय शिबीर Health Promotion Trust (HPT) अर्थात आरोग्य संवर्धन न्यास या नोंदणीकृत संस्थेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते…. फादर रॉकी बान्झ यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईस्थित Catholic Medical Outreach आणि सौं. डोना बारेटो व डॉ. चेरिल डिसोझा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला…. HPT संघटनेच्या सिस्टर असुंता पाटील (माणगाव) यांनी शिबिराबाबत लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली….
शिबिरात अस्थिरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते…. यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना अत्यंत उपयुक्त व सर्वसमावेशक आरोग्यसेवा मिळाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास माणगाव येथील सर्वविकास दीप (SVD) या आणखी एका ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष फादर थॉमस भाऊ व त्यांच्या टीमनेही शिबिरास भेट दिली…. रोहा, तळा, महाड व माणगाव तालुक्यातील समन्वयकांनी शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली…. या शिबिराबाबत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले…. यावेळी एका नागरिकाने सांगितले, “हे पूर्णपणे मोफत शिबीर आमच्यासाठी खरोखर उपयुक्त ठरले…. संपूर्ण शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले… त्याचबरोबर आलेल्या प्रत्येकाला योग्य सेवा देण्यात आली…” अमरदीप ट्रस्टच्या इतिहासात ही एक महत्त्वाची कामगिरी ठरली असून, सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुन्हा एकदा या उपक्रमातून समाजापुढे ठेवण्यात आला आहे….