चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-
शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद चौक, वडगांव व वासंबे युवा सेनेच्या वतीने ओम साई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते….
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद चौक, वडगांव व वासांबे युवा सेना यांच्या वतीने महा रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते… यात मोफत रक्तदाब, मधुमेह, इ.सी.जी., एस.पी.ओ.टू.आणि युरिन टेस्ट यांची तपासणी करण्यात आली…. यावेळी निदान झाल्यावर मोफत औषध देण्यात आले…. शिबिराचे उद्घाटन तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे आणि माजी उप सभापती श्याम साळवी यांच्या हस्ते करण्यात आले…. यावेळी सरपंच सुहास कदम, शिरवली सरपंच महेश पाटील, युवा सेना तालुका प्रमुख निखिल मालुसरे, जिल्हा सचिव प्रशांत खांडेकर, रामदास काईनकर, प्रकाश जाधव, सुरेश घाग, गोरख रसाळ, स्वप्नील सोनटक्के, अजिंक्य चौधरी, विष्णू खैर, पीयूष पारठे, राजाभाऊ कोठारी ज्यांनी ५१९ रक्तदान शिबिर आयोजित करून स्वतः १०९ रक्त बाटल्या देऊन ६३००० हजार रक्त बाटल्या जमा करून दिले त्यांची विशेष उपस्थिती होती…. डॉ.वसंत, डॉ.सौ.भिसे व त्यांच्या स्टाफ यांनी विशेष सहकार्य केले…. यावेळी रक्त बाटल्या संकलित करण्यात आल्या…. रक्तदाते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला….