पनवेल शिवसत्ता टाइम्स (न्यूज ब्युरो) :-
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री सन्मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक सामाजिक उपक्रम म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख रामदास गोवारी यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले…. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले…
यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख अवचित राऊत, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी, शहर प्रमुख व आयोजक रामदास गोवारी, संतोष गोळे, धाया गोवारी, सचिन त्रिमुखे, बबन गोगावले, गणेश खांडगे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, शहर संघटिका सौ. संगीता राउत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते….
त्याचप्रमाणे एक सामाजिक उपक्रम म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी शहर शाखा येथे १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला…. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आले…. यावेळी उपमहानगर प्रमुख शिवाजी दांगट, शहर प्रमुख व आयोजक सदानंद शिर्के, गणेश परब, संदीप तोरणे, शहर संघटिका सौ. सानिका मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते….