रोहातील ऐतिहासिक वेशीवरच्या मारुती मंदिराचे ९६ वर्षानंतर लोकार्पण… खा.सुनील तटकरे सौ.वरदा तटकरे यांच्या हस्ते कार्यक्रम पडला पार…  

0
17

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

रोहा येथील राम मारुती चौका येथे असलेले मारुतीचे मंदिर हे तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वी असल्याचे बोलले जाते… हे मंदिर रोहा शहराच्या वेशी वर असल्याने त्या मारुती मंदिराचे जीर्णोद्धार रोहेकरांनी 1929 साली 756 रूपये खर्च करून दगडी माती लाकूड व कौलांचा वापर करून 96 वर्षापूर्वी उभा केला होता… आज 96 वर्षानंतर पुन्हा खासदार सुनील तटकरे व रोहेकरांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून, श्रावणातील पहिला शनिवारी त्याचे विधिवत पूजाअर्चा व प्राणप्रतिष्ठा करून रायगडचे खा. सुनील तटकरे सौ.वरदा तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले… यानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या धरतीवर ज्या पद्धतीने लाइटिंग करण्यात आले आहे  तशाच पद्धतीने रोहा शहराच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी हाय मॅक्स दिव्यांचा लाईटचे बटन दाबून रोहा शहराला क्वीन नेकलेस घातल्याप्रमाणे रोहा शहर लाईटच्या लक्ख प्रकाशाने उजळून निघाला….  यानंतर रोहा शहरातील नवीन पिढीला आपल्या शरीर सुदृढ निरोगी आरोग्य लाभावा याच्या दृष्टिकोनातून नव्याने व्यायाम शाळेचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले यावेळेस रोहा अष्टमीतील नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…