महाड (कोळोसे)शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
शेतकर्यांना आणि पशुपालकांना पशु लसीकरणाचे महत्त्व समजावे, यासाठी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, पशुवैद्यकीय अधिकारी, महाड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित, कृषि महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली (महाड) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदूतांमार्फत कोळोसे गावात ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 अंतर्गत जनावरांचे लसीकरण शिबिर राबविण्यात आले….
या कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती महाड येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. धनंजय डुबल, पशुधन पर्यवेक्षक डॉ. अश्विनी पडळकर, डॉ. प्रभाकर मोरे, सरपंच संजना पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत कदम, ग्रामपंचायत सदस्य कल्याण शिंदे यांनी उपस्थिती लावली…. यावेळी डॉ. धनंजय डुबल व डॉ. अश्विनी पडळकर यांनी शेतकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले…. लसीकरण का करावे व त्याचे उपयुक्त फायदे हे शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने पटवून सांगितले….
या शिबिरांतर्गत कोळोसे गावातील सर्व जनावरांना एफ.एम.डी (लाळ्या खुरकूत) रोग व लंपी त्वचारोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले…. कृषि महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली (महाड) चे प्राचार्य डॉ. व्हि.जे.गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक डॉ.एस.एस.रायकर, कार्यक्रम अधिकारी व सहायक प्राध्यापक एस.एस.संकपाळ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांचे लसीकरण शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले….
कृषि महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली (महाड) येथील कृषिदूतांमध्ये मानव पाटील, रामचंद्र ठणके, रोहन चव्हाण, विपुल हगवणे, प्रतिक जाधव, युवराज सुर्यवंशी, गौरव विश्वकर्मा, समीर न्हावेलकर यांचा समावेश आहे…. या शिबिरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता….