पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
साहस फॉउंडेशनच्या वतीने मालाबार गोल्ड अँड डायमंडस्च्या साहाय्याने महिलांसाठी “रॅम्प वॉक आणि फोटो शूट विथ रिअल गोल्ड अँड डायमंड्स पनवेल येथील प्रसिद्ध असलेल्या मालाबार शोरूममध्ये आयोजित करण्यात आले होते… कार्यक्रमाचे उदघाटन बॉलीवूड कोरिओग्राफर देव अग्निहोत्री, प्रसिद्ध असलेल्या टी सिरीजचे मालक भूषण कुमार यांचे पर्सनल असिस्टंट रॉकी शर्मा , सोशल इन्फ्लुएन्सर व मोटिवेशनल स्पीकर रुपेश हुलावळे व मॉडेल आणि अभिनेता भार्गवा बजाज यांनी द्वीप प्रज्वलन करून केले…. साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप यांनी माहिती दिली कि महिलांना यशस्वी मॉडेल बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी साहस फाउंडेशन वचनबद्ध आहे… आमचे ध्येय प्रतिभेचे संगोपन करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि उद्योगातील शीर्ष सुवर्ण आणि फॅशन ब्रँडशी इच्छुक मॉडेल्सना जोडणे आहे…. तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा तुमचा मॉडेलिंग प्रवास पुढील स्तरावर नेण्याचा विचार करत असाल, साहस फाउंडेशन तुमच्या स्वप्नांना मार्गदर्शन करण्यासाठी, समर्थन देण्यासाठी आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी वचनबद्ध आहे….
कार्यक्रमांमध्ये एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता… स्पर्धकांना क्राऊन आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले…. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कांचन नितीन मोटधरे यांनी केले… या अनोळखी व नाविण्य पूर्ण फोटो शूट घडवून आणल्याबद्दल साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा कुरूप, उपाध्यक्षा दीपिका भांडारकर, सुनीता छेडा, चित्रा महिन्द्रीगीकर अनघा गोळे, शीतल आंबेरकर, नमिता दुबे, वृषाली पाटील, सुप्रिया सावंत, माधवी म्हात्रे, प्रिया जगताप, हर्षला, विद्या चित्ता, रश्मी झेमसे ह्यांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे….ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्षा रेश्मा कुरूप यांनी मालाबार गोल्ड अँड डायमंड्स मधील या अमृता व इतर मॅनेजिंग कमिटीचे आभार व्यक्त केले…