अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
तुमच्यावर गुन्हा दाखल आहे…सुप्रीम कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे…अशा भीतीदायक वाक्यांमधून सामान्य नागरिकांना गाफील ठेवत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सायबर टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सुरू असलेल्या या फसवणुकीचा भांडाफोड करत पोलिसांनी देशातील विविध राज्यांतून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात 66 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.आरोपी हे वेगवेगळ्या राज्यांतून नागरिकांना कॉल करत. “तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, तुम्हाला अटक होऊ शकते. यासाठी तुमचा डिजिटल अरेस्ट करण्यात येणार आहे,” असं सांगत ते नागरिकांना गोंजारत. त्यानंतर “जर तुम्हाला या प्रकरणातून सुटायचं असेल तर अमुक इतकी रक्कम भरावी लागेल,” अशा फसव्या धमक्या आणि लालच दाखवत ऑनलाईन पैसे उकळायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्यावर गुन्हा दाखल आहे तुमच्यावर सुप्रीम कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे अस सांगून डिजिटल अरेस्ट माध्यमातून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भुरट्या डिजिटल चालाखबाज चोरट्यांचा रायगड पोलिसांनी अखेर पर्दाफाश केलाय. वेगवेगळ्या कंपनीचे सीम कार्ड वापरून देशातील अनेक भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातून घाबरवण्याचा बनाव करत या नागरिकांकडून तब्बल 66 लाख रूपयांची डिजिटल फसवणूक केल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणातून उघडकीस आला आहे.तुम्हाला या प्रकरणातून सुटायचे असेल तर वेगळे पैसे भरावे लागतील अशी लालच दाखवून वेगवेगळ्या भागातील नागरिकांना या चोरट्यांनी गंडा घातला होता. देशातील सर्वात मोठा डिजिटल अरेस्टचा गुन्हा असल्याची माहिती रायगडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली आहे. त्यामुळे दलाल आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.आरोपी विविध टेलिकॉम कंपन्यांची सीमकार्ड वापरून नागरिकांना कॉल करत असत. हा डिजिटल फसवणुकीचा प्रकार देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याचे रायगडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे… 1.अब्दुल सलाम बारभुयान, उत्तरप्रदेश2. बिलाल फैजान अहमद, लखनौ3. नदीम महंमद अस्लम अहमद, जैनपूर4. लॉरेब मोहंमद रफिक खान, उत्तरप्रदेश5. शदाब रियाज अहमद खान, उत्तरप्रदेश6. मोहंमद फैसल खान, उत्तरप्रदेश7. बालमोरी विनायककुमार राव, हैदराबाद8. गंगाराम गंगाधर मुट्टन, हैदराबाद9. अभय संतप्रकाश मिश्रा, उत्तरप्रदेश10. मोहसीन मियां खान, उत्तरप्रदेश11. शम्स ताहीर खान, राजस्थान असून 6176 सीम कार्ड्स,66 लाखांचे डिजिटल व्यवहार,112 बँक खाती,35 मोबाईल फोन्स,कॅनरा बँक एटीएम कार्ड्स देखील जप्त करण्यात आले आहे…