बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्तते नंतर मालेगावात आनंदोत्सव… सनातन धर्म की जय घोषणांनी मोसम पुल परिसर दणाणला…

0
15

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):- 

सन 2008 मध्ये मालेगावात घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित करत मोठा निकाल दिला…या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आदींवर खटला चालू होता.न्यायालयात कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने अखेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील ‘भगवा आतंकवाद’ या आरोपाला मोठा झटका बसला आणि सर्व आरोपी निर्दोष सुटले.या निर्णयानंतर मालेगावात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा चौकात जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.पेढे वाटप, फटाके फोडणे, ढोल-ताशांच्या गजरात नाच, घोषणा आणि दुग्धाभिषेक अशा उत्साहात वातावरण भारावले.सनातन हिंदू धर्म की जय”, “जय श्रीराम”, “भारतीय संविधानाचा विजय असो” अशा घोषणांनी मोसम पुल परिसर काही वेळासाठी थरारला!साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की – आज हिंदू धर्मावरील ‘भगवा आतंकवाद’चा कलंक मिटला!अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.