रायगडच्या राजकारणात शिवसेना राष्ट्रवादीत वादाची ठिणगी… ॲड राजीव साबळे लवकरच राष्ट्रवादीच्या वाटेवर…

0
17

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

सध्या रायगडच्या राजकारणात उलटापालट होणार हे सिद्ध झाले.ॲड राजीव साबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर जाणार या चर्चा चालू झाल्या आणि दोन ऑगस्ट रोजी एडवोकेट राजू साबळे शिंदे शिवसेनेला रामराम करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश करणार . खासदार सुनील तटकरे यांनी राजू साबळे यांचा पक्षप्रवेश निश्चित केला असून रायगडच्या राजकारणात शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात वादाची ठिणगी पडणार आहे…माणगाव येथे मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएससी स्कूल या भव्य पटांगणात राजीव साबळे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार याचीच जय्यत तयारी सुरू झाली आहे…याचाच आढावा आमच्या माणगावच्या  प्रतिनिधीने घेतला आहे…