महाडमध्ये युवा सेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन… माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रायगडच्या युवा सेनेने मारले जोडे…

0
5

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक येथील बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची मुक्तता झाल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना एक धक्कादायक वक्तव्य केले… त्यांनी भगवा आतंकवाद न म्हणता सनात आणि आतंकवादी किंवा हिंदू आतंकवादी म्हणा असे उद्गार काढत त्यांनी एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलत असताना राज्यामध्ये झालेल्या अनेक घटनांचा दाखला दिला आहे… यावर आता शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेना युवा सेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यात येत आहे… आज रायगड जिल्ह्यातील शिवसेना युवा सेनेच्या वतीने महाडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात युवा सैनिक उपस्थित होते…