चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) : –
महसूल सप्ताहाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत माडप यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्ष लावून, वृक्ष लागवड व वृक्ष जोपासणे कार्यक्रमाचा शुभारंभ केला…. १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल सप्ताहाला सुरुवात झाली… या कार्यक्रमाच्या निमित्ताने महसूल विभागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत… याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत माडप यांनी मोकळे झालेले पाणंद व शिव रस्ते मोकळे झाल्याने त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून, लावलेले वृक्ष जोपासणे या उद्देशाने विद्यार्थी, ग्राम पंचायत,कर्मचारी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास सुरुवात केली, याचा शुभारंभ खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला…. यावेळी निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सरपंच अर्चना पाटील, महसूल मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, तलाठी अभिजीत हिवरकर,ग्राम पंचायत अधिकारी महेश म्हसे, माजी उप सभापती विश्वनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…. यावेळी वृक्ष दत्तक म्हणून ताब्यात घेतले….